0

Share

भाजयुमो मुंबईतर्फे ७ ठिकाणी ‘मन की बात – Gen Next सोबत’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

Post details:

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने आज मुंबईतील ७ विविध ठिकाणी ‘मन की बात – Gen Next सोबत’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या १३५ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.
युवा पिढीपर्यंत पंतप्रधानांचे विचार सहज आणि आधुनिक वातावरणात पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम कॉफी शॉप्स आणि मॅकडोनाल्ड्ससारख्या लोकप्रिय ठिकाणी आयोजित करण्यात आला. ‘Gen Next’ अर्थात नव्या पिढीला राष्ट्रविकासाच्या प्रवाहाशी जोडणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि देशहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
कार्यक्रमानंतर उपस्थित युवकांनी देशाचा विकास, स्टार्टअप, शिक्षण, आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रनिर्माणातील युवाशक्तीची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर उत्स्फूर्त चर्चा केली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे जी , कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा जी , आमदार मुरजी पटेल, माजी खासदार मनोज कोटक जी , नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंह तिवाना, भाजपा मुंबई सचिव व नगरसेवक प्रतीक कर्पे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा केवळ रेडिओ कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी युवकांना प्रेरणा देणारे लोकचळवळीत रूपांतर झाले आहे. ‘मन की बात – Gen Next सोबत’ या उपक्रमातून आम्ही युवकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी एकत्र आणून पंतप्रधानांच्या विचारांशी, राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाशी आणि जनभागीदारीच्या संदेशाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही भाजयुमो मुंबई युवकांना समाजहित आणि राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांशी जोडण्यासाठी असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम सातत्याने आयोजित करत राहील.”
ते पुढे म्हणाले, “‘मन की बात’ हा समाजाला नवी दिशा देणारा संवाद आहे. आजची युवा पिढी देशाची प्रगती केवळ पाहत नाही, तर त्या प्रगतीची भागीदार होण्याची इच्छा बाळगते. त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने भाजयुमो मुंबईचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
कॉफी शॉप्स आणि मॅकडोनाल्ड्ससारख्या आधुनिक वातावरणात ‘मन की बात’ ऐकण्याच्या या उपक्रमाला मुंबईतील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधानांच्या संदेशाचे श्रवण केल्यानंतर युवक आणि उपस्थित मान्यवरांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाविषयी सकारात्मक आणि प्रेरणादायी संवादही झाला.

Entertainment

NRI દુલહન : ભારતીય સંસ્કૃતિને ઓળખતા આખરે NRI યુવતીએ ઇન્ડિયન દુલ્હો પસંદ કર્યો નિર્માતા રમેશ શાહ અને વિપુલ સંઘવીએ નવતર ચીલો પાડ્યો લેખક અને દિગદર્શક ભરત મહેતાની ફરી તેની કરામત દર્શાવે છે

Quick Link

Categories

Keep up to date

Email

By pressing the subscribe button, you confirm that you have are agreeing to our Privacy Policy and Terms of Use.

© 2025, ssoninews. All rights reserved.